लातूर, ५ जानेवारी २०२५:डॉ. रजिया शेख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ के जी एन टेस्ट ट्युब बेबी हॉस्पिटल आणि नोबल सामाजिक विकास प्रतिष्ठाण, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा उद्देश गरजू रुग्णांना उच्च दर्जाची वैद्यकीय तपासणी व सल्ला विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे.

तपासण्या आणि सेवा: एकाच छताखाली विविध तज्ञ डॉक्टरांचा सल्ला
या शिबिरामध्ये खालील प्रकारच्या तपासण्या केल्या जाणार आहेत:
वंध्यत्व तपासणी: मुलं न होणाऱ्या जोडप्यांसाठी विशेष उपचार व सल्ला.
गर्भवती महिलांसाठी विशेष मार्गदर्शन व आरोग्य तपासणी.
हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, अर्धांगवायु आणि मेंदू विकारांचे निदान.
डोळे, कान-नाक-घसा, अस्थिरोग, आणि बालरोगांचे तज्ञ सल्ला.
सर्जिकल आजारांवर तपासणी: हार्णिया, हायड्रोसिल इत्यादी.
उत्कृष्ट तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती
शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांचा चमू विविध आजारांवर तपासणी आणि सल्ला देण्यासाठी उपस्थित राहील. काही प्रमुख तज्ञ डॉक्टर खालीलप्रमाणे आहेत:
डॉ. आमिर शेख M.D., D.G.O. (Mumbai) FCPS, DFP (स्त्रीरोग तज्ञ)
डॉ. चाँद पटेल M.D(मधुमेह तज्ञ)
डॉ. असद खान M.D (बालरोग तज्ञ)
डॉ. शतारी (M.D., जनरल फिजीशियन)
डॉ. मुख्तार M.D. (भूलतज्ञ)
डॉ. राघवेंद्र देशमुख (M.S., सर्जन)
डॉ. इम्रान जमादार M.S. Opth. (डोळ्यांचे तज्ञ)
डॉ. मन्सुर भोसगे D. Ortho. ( अस्थिरोग तज्ञ)
डॉ. आयाझ शेख (D.C.H., बालरोग तज्ञ)
डॉ. अजीम मशायक M.S. Opth. (डोळ्यांचे तज्ञ)
डॉ. सादिया शेख ENT (कान, नाक, घसा )
डॉ. नाजीया शेख BHMS, CGO (स्त्रीरोग तज्ञ)
कार्यक्रमाचे ठिकाण, वेळ आणि नाव नोंदणी प्रक्रिया
दिनांक: रविवार, ५ जानेवारी २०२५
वेळ: सकाळी १० ते दुपारी २
स्थळ: रजिया क्लिनीक, आयेशा मस्जिदच्या बाजूला, गल्ली नं. ४, इस्लामपुरा, लातूर.
नोंदणीसाठी संपर्क: 📞 81779 48326
आरोग्याकडे एक पाऊल पुढे – मातृत्वाच्या दिशेने प्रवास
के जी एन टेस्ट ट्युब बेबी हॉस्पिटल हे वंध्यत्व उपचारासाठी प्रख्यात आहे. वंध्यत्व ते मातृत्वाच्या प्रवासासाठी इच्छुक असलेल्या जोडप्यांसाठी ही एक मोठी संधी आहे.
तुमच्या आरोग्यासाठी पुढाकार घ्या आणि या शिबिराचा लाभ मिळवा. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी आजच संपर्क साधा!
Comments